Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलं पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन, पाहा PHOTO

Actress Prajakta Mali took darshan of five revered Ganpatis in Pune, see PHOTO

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. चाहत्यांसोबत संपर्कात प्राजक्ता कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे यानिमित्ताने प्राजक्ताने पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेतलं. यावेळचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे युवासेनेचे अध्यक्ष होणार; शिंदे समर्थकांनी पोस्टर केले व्हायरल

प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पुण्यातील मानाच्या गणपतींच्या दर्शनाचे फोटो शेअर केले आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “सालाबादप्रमाणे… पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी “हिंदुस्तानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची – भाऊसाहेब रंगारी गणेशाची” आरती करण्याचं पुण्य पदरात पडलं.”

Nitin Gadkari: गडकरींनी दिला ट्रॅफिकच्या समस्येवर रामबाण उपाय, पुण्यात आणणार उडत्या बसेसची योजना

प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर चाहते वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत. काही चाहते तिला गणेशोत्सवाच्या देखील शुभेच्छा देत आहेत. दरम्यान प्राजक्ताच्या वर्कबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपासून ती ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे चांगलीच चर्चेत होती. यानंतर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित ‘वाय’ चित्रपटात दिसली होती.

Devendra Fadnavis: नव्या “नोंदणी व मुद्रांक” भवनाचे आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *