![Actress Sonali Kulkarni shared the first wedding photo, see PHOTO](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/08/Sonali-Kulkarni-1024x538.jpg)
मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्ह्णून तिला ओळखले जात. मागच्या काही दिवसांपूर्वी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली-कुणाल पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकले. पण सोनालीने आत्तापर्यन्त तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नव्हते. पण आता अखेर सोनालीने तिच्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत.
सोनालीने नुकतंच तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत कुणालने सोनालीचा हात हातात घेतल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत सोनाली ही सप्तपदी चालताना दिसत आहे. यामध्ये दोहांचे चेहरे दिसत नाहीत. पण फोटो पाहून स्पष्ट होते की, त्या दोघांनी खूप पारंपारिक पद्धतीने लग्न केले आहे.
फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिले की, “07.05.2022. ते. 11.08.2022…, राखून ठेवलेले हे क्षण, साठवून ठेवायला फक्त ६ दिवस बाकी”. त्याचबरोबर तिने SonaleeKunalAWeddingStory on प्लॅनेट मराठी, 11august, SonaleeKunal, kenosona, sonaleekulkarni, kunalbenodekar असे विविध हॅशटॅगही शेअर केले आहेत.