Sushmita Sen । अभिनेत्री सुष्मिता सेनची खालावली प्रकृती, वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय

Actress Sushmita Sen's health deteriorated, her father took an extreme decision

Sushmita Sen । अभिनेत्री सुश्मिता सेन मागील काही दिवसांपासून ‘ताली’ या वेब सीरिजमुळे (Web series) चर्चेचा विषय बनत आहे. तिची आगामी वेब सीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परंतु या अभिनेत्रीची एका कार्यक्रमापूर्वीच प्रकृती खालावल्याने तिच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला. (Sushmita Sen Upcoming Web Series)

Post Office Saving Schemes । पोस्ट ऑफिसची पती-पत्नीसाठी शानदार योजना, होईल 59,400 रुपयांचा फायदा

सुश्मिता सेनला नुकताच टेक्नो इंडिया यूनिवर्सिटी (Techno Indian University) तर्फे डॉक्टरेट पदवी देत सन्मानित करण्यात आले. परंतु तब्येत ठीक नसल्याने ही पदवी सुश्मिता सेनच्या वतीने तिच्या वडिलांनी सन्मान ग्रहण केला. याबाबत सुश्मिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने असे म्हटले आहे की, ‘किती मोठा सन्मान! मला डी.लिटचा सन्मान दिल्याबद्दल टेक्नो इंडिया युनिव्हर्सिटी आणि नारायणमूर्ती यांचे खूप आभार.’

Politics News | ‘या’ कारणास्तव काका- पुतण्याची भेट झाली असावी, भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

पुढे तिने कार्यक्रमाला उपस्थित न राहण्यामागचे कारण सांगितले आहे. ‘मी तुम्हा सर्वांची माफी मागते. कारण कॉन्वोकेशनसाठी मला यायला जमले नाही. व्हायरल असल्यामुळे डॉक्टरांनी मला आराम करण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे मला या कॉन्वोकेशनमध्ये उपस्थित राहता आले नाही.’ तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Google Maps Offline । बिनधास्त फिरायला जा! इंटरनेटशिवायही ‘असे’ चालेल गुगल मॅप

डॉक्टरेट पदवी मिळवल्यामुळे तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. लवकरच ती पुन्हा एकदा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ताली’ या वेब सीरिजमुळे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Politics News । राज्यामध्ये पुन्हा मोठा राजकीय भूकंप? अजित पवार-शरद पवारांच्या भेटींवर चर्चांना उधान; काँग्रेस नेत्याचे मोठे वक्तव्य

Spread the love