अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. स्वराने मधोलाल कीप वॉकिंग चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. स्वराने दोन स्क्रीन पुरस्कार देखील मिळवले आहेत. स्वराने 2009 मध्ये माधुलाल कीप वॉकिंग या नाटकात सहाय्य भूमिकाद्वारे पदार्पण केले परंतु ते व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरले. स्वराने अनेक चित्रपटांमध्ये काम केले नसले तरी तनु वेड्स मनू या चित्रपटामुळे तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
गौतमीचा कार्यक्रम सुरु झाला अन् महिलांनी केलं असं कृत्य की सर्वजण पाहतच राहिले; पाहा Video
स्वराचे आत्तापर्यंत 14 चित्रपट प्रदर्शित झाले तर त्यापैकी 9 चित्रपट हे फ्लॉप ठरले. एवढे चित्रपट फ्लॉप ठरवून देखील स्वरा ही कोट्यावधीची मालकीण आहे. स्वराने चित्रपटामध्ये काम करण्यापूर्वी छोट्या पडद्यांवर देखील काम केले. स्वराच्या संपत्ती विषयी सांगायचे म्हटले तर पाच कोटी डॉलर्स म्हणजेच तब्बल 40 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच ही कमाई तिच्या अभिनयाच्या माध्यमातून तिने कमावलेली आहे. एका चित्रपटासाठी ती चार ते पाच कोटीचे मानधन घेते. व तसेच तिच्या कमाई मधून तिने एक अलिशान फ्लॅट घेतला आहे, ज्याची किंमत कोट्यावधीशीच्या घरात आहे. स्वराला बीएमडब्ल्यू एक्स १ यांसारख्या महागड्या गाड्यांचे देखील आकर्षण आहे.
समाजवादी पक्षाचे नेता असलेला फहद अहमद आणि स्वरा यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये विवाह केला. स्वराने तीन पद्धतीने लग्नविवाह केल्यामुळे तिची सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. प्रथमता कोर्ट मॅरेज त्यानंतर कर्नाटकमध्ये दक्षिणात्य पद्धतीने व शेवटी निकाह पद्धतीने विवाह केला. यानंतर दिल्लीत ग्रँड रिसेप्शन देखील केलं. या रिसेप्शनला राजकारणातील दिग्दज नेते उपस्थित होते.