Mahima Chaudhary: “त्या काळी व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच…”अभिनेत्री महिमा चौधरींनी सिनेसृष्टिबाबत केला धक्कादायक खुलासा

"Actresses who were virgins at that time..." actress Mahima Chaudhary made a shocking revelation about cinematography

मुंबई : महिमा चौधरी (Mahima Chaudhary) ही हिंदी चित्रपटांची अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. मॉडेलिंग (modeling) कारकिर्दीत ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली. दरम्यान 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस'(pardes movie) या चित्रपटातून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

पपईची लागवड केल्यावर शेतकऱ्यांना मिळणार ‘एवढी’ सबसिडी, असा करा अर्ज

मात्र अचानक एका घटनेनं महिमाचे अख्ख आयुष्य बदललून गेले. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब गेल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान २०१६ पासून महिमा अभिनयापासून लांब झाली. २०१६ मधला ‘डार्क चॉकलेट’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. आता ती अनुपम यांच्या ‘द सिग्नेचर’ या चित्रपटात दिसणार आहे. महिमाने चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला होता.

Rahul Gandhi: ‘हे’ आहे राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेच उद्दिष्ट, सामानाच्या अग्रलेखातून आले समोर

अभिनेत्री महिमा चौधरी ही नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिने सिनेसृष्टीत कशाप्रकारे अभिनेत्रींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नकार दिला जातो, याबद्दल भाष्य केले होते. यावेळी महिमा म्हणाली, “मला असे वाटते की आता चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना योग्य भूमिका आणि चित्रपटात त्यांच्या योग्य सीन्स दिले जात आहेत. त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदलाही मिळत आहे. महत्वाचं म्हणजे आत्ताच्या अभिनेत्रीकडे पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या ऑफर्स येत आहेत. खरतर पूर्वी चित्रपटसृष्टीत ही स्थिती नव्हती ”

State Govt: राज्य सरकारची विशेष मोहीम! या कालावधीत होणार ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’

“पूर्वीची सिनेसृष्टी ही पुरुषप्रधान असायची. त्या काळात अभिनेत्रींच्या रिलेशनशिपचा परिणाम त्यांच्या कामावर व्हायचा. जर तुम्ही कुणाला तरी डेट करताय हे कळताच त्याबाबत चर्चा सुरु व्हायच्याकारण व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच एखादी भूमिका करण्यास प्राधान्य दिले जायचे. एवढच नाही तर अशा अभिनेत्रींनाही प्राधान्य दिले जायचे ज्यांनी आजवर किस केलेले नाही.” असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री महिमा यांनी केला आहे.

Vijay Deverakonda: ‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडा पोस्ट शेअर करत म्हणाला, “मी सिंगल…”

“तुमच्या रिलेशनशिपबद्दल जर चर्चा रंगली की एखाद व्यक्ती तुम्हाला डेट करतोय आणि जर तुमचे लग्न झाले असेल तर तुमचे करिअर संपलेच म्हणून समजा. त्याकाळी बॉलिवूडमध्ये काम करणे आणि वैवाहिक स्थिती याला फार महत्त्व होते.” असेही त्या म्हणाल्या.पुढे अभिनेत्री महिमा म्हणाल्या की “ आता पहिल्यासारखी स्थिती राहिली नाही. तुम्ही कुणाला डेट केलं तरी याचा परिणाम तुमच्या कामावर होत नाही. कारण आता सर्वचजण प्रोफेशनल लाइफ आणि प्रायवेट लाइफ दोन्ही वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळं आता चित्रपटसृष्टीतील करिअरवर जास्त दगा येत नाही”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *