‘द केरळ स्टोरी’ (The kerala Story) हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे होऊन गेले तरीदेखील हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या चर्चा देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहेत. दरम्यान या सिनेमातील अदा शर्मा (Ada Sharma) या अभिनेत्रीच्या भूमिकेचे व तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Ada Sharma gets hyper over controversies of ‘The Kerala Story’ movie)
दरम्यान, द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या कथानकावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर अभिनेत्री अदा शर्माने आपला राग व्यक्त केला आहे. ” निर्मात्यांकडे असलेले तथ्यात्मक पुरावे लवकरच समोर येणार आहेत. पुरावे त्यांना आधी दाखवायचे नव्हते. कारण आधी पुरावे दाखवले असते, तर सर्वकाही फक्त प्रमोशनसाठी सुरु आहे. असा तुम्ही विचार केला असता.. ” असे म्हणत सिनेमाच्या सत्यतेवर बोट ठेवणाऱ्या लोकांना अदाने फटकारले आहे.
‘स्वतःच्या सोयीनुसार वापरलं…’; अखेर घटस्फोटवर मानसी नाईकने व्यक्त केली मनातली सल
या सिनेमाला झालेल्या विरोधाचा आणि रंगलेल्या वादाचा कोणताही परिणाम ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर झाला नाही आणि सिनेमाने सर्व अडचणींवर सुखरूपपणे मात केली आहे. निवडणुकीचा हा परिणाम आहे असे देखील अनेकजण म्हणाले. मात्र, तिसऱ्या आठवड्यात देखील सिनेमाचं उत्तम कलेक्शन होत आहे. अशात सिनेमा प्रोपगंडा असल्याचं अनेक जण म्हणाले आहेत. शिवाय कमाईच्या आकड्यांना देखील फेक सांगितले आहे. असे देखील अदा यावेळी म्हणाली.
Koyta Gang | पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा धुमाकूळ, असच चालू राहिले तर पुण्याचाही बिहार होणार का?
‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील आकड्यांच्या चर्चांवरून देखील अदाने आपला राग व्यक्त केला आहे. ” सुरुवातीला मला या गोष्टीचा खूप तणाव वाटत होता. मी रागवायची. माणसाचं आयुष्य खरंच इकतं स्वस्त आहे का? ज्याला आपण फक्त आकड्यांमध्ये मोजतो. ती व्यक्ती आपली नसल्यामुळे तिला आपण आकड्यांमध्ये मोजतो! त्या आकड्यांमध्ये तुमची आई, बहीण, प्रेमिका, मैत्री असती तर मला नाही वाटत तेव्हा लोक आकड्यांबद्दल बोलले असते. मग ते ३ असो किंवा ३२…”