Bus Accident । पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुल झाला आहे.भाविकांच्या गर्दीमुळे मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. देवदर्शनाहून माघारी येत असताना एका बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. यामध्ये 7 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 26 जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)
महायुतीला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केली स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार, काही भाविक देवदर्शनासाठी गुजरातहून आले होते. ही बस काल रात्री 8 वाजेच्या सुमारास उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावरील गंगनानीजवळ 50 फूट खोल दरीत बस कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील 26 जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. (Bus Accident News)
Animal Husbandry Business : ‘ही’ गाई देते 800 लिटर दूध, जाणून घ्या नेमकी काय आहे खासियत?
या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून 0134 222722, 222126 आणि 7500337269 हेल्पनंबर जारी करण्यात आला आहे. त्यावर संपर्क करून जखमींची माहिती घेण्याचं आवाहनदेखील केले आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त करत जिल्हा आरोग्य प्रशासनाला जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.