अनेकांना दारूचं व्यसन असतं. दारुच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. दारूचे व्यसन (Addiction to alcohol) ईतके वाईट असते की,त्याच्यामुळेच कौटुंबिक हिंसाचार (Domestic violence) वाढत असतोच. फक्त कौटुंबिक हिंसाचारच नव्हे तर काहीवेळा माणसं एकमेकांना मरतात सुद्धा. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) पिलीभीत जिल्ह्यात घडली आहे. येथे एका मद्यधुंद तरुणाला (drunken youth) दारु घेताना 10 रुपये कमी पडले. त्यामुळे त्याला दुकानदाराने दारु दिली नाही. दरम्यान त्या मद्यधुंद तरुणाने दारुच्या दुकानालाच आग लावली. तसेच या आगीत दुकानदारही गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर दुकान पेटवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आता दिवाळीत फटाक्यांचा ‘आवाज’ नियंत्रणात राहणार, वाचा सविस्तर
नेमकी घटना काय घडली?
सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील पिलीभीत जिल्ह्यात बारखेडामधील दौलतपूर रोडवर एक दारूचे दुकान आहे. या दारूच्या दुकानात राजीव नावाचा व्यक्ती दारु विक्रीचं काम करतो. दरम्यान शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास राजीव हा दुकानात बसला होता. त्यावेळी बारखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आधकटा गावात राहणारा शिवा दारू घेण्यासाठी दुकानात आला होता. दरम्यान यावेळी शिवाने दारूसाठी घेण्यासाठी फक्त 120 रुपये दिले. परंतु दारुच्या बाटलीची किंमत होती 130 रुपये. शिवाकडे पैसे कमी असल्यामुळे दुकानदार आणि शिवाचा वाद झाला.
हिरडगावमधील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी किल्ले धर्मवीरगड पूजन करून दीपोत्सव साजरा केला
दरम्यान काही वेळानंतर हा वाद मिठवण्यातही आला.आणि शिवा त्या दुकानातून निघूनही गेला. मात्र थोड्या वेळाने शिवा पुन्हा त्याच दारूच्या दुकानात आला. व त्याने बाटलीतून आणलेल पेट्रोल दुकानाच्या काही भागावर टाकले आणि थेट दुकानालाच आग लावली. आता यासंदर्भात त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बाबो! तब्बल १० कोटींचा म्हैस रेडा, ‘ही’ आहेत त्याची वैशिष्ट्ये