शाळेतील विद्यार्थी शिक्षकांना नेहमी सर किंवा मॅडम अशी हाक मारतात. मात्र याविषयी सरकारने आता खुप मोठा निर्णय घेतला आहे. केरळ राज्य बाल संरक्षण आयोगाने राज्यातील सर्व शाळांना नवे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार शाळेतील शिक्षकांच्या लिंगाची पर्वा न करता विद्यार्थ्यांनी त्यांना ‘टीचर’ म्हणून संबोधायचे आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आता ‘सर’ किंवा ‘मॅडम’ म्हणू नये. असे यामध्ये सांगण्यात आले आहे.
मोठी बातमी! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा घेणार निवृत्तीची
राज्य बाल संरक्षण आयोगाचे ( State Child Protection Pannel) अध्यक्ष के. व्ही. मनोजकुमार व सदस्य सी. विजकुमार यांच्या पॅनलने बुधवारी ( दि.11) सामान्य शिक्षण विभागाला यासंबंधी निर्देश दिले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी ‘सर’ आणि ‘मॅडम’ सारख्या शब्दांनी हाक मारणे टाळावे असे नमूद करण्यात आले आहे.
धक्कादायक! मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात
शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांना ‘सर’ किंवा ‘मॅडम’ संबोधल्यास शाळांमधील मुलांमध्ये स्त्री- पुरुष समानतेची ( Equality) भावना रुजत नाही. मात्र ‘टीचर’ म्हंटल्यास मुलांमध्ये समानतेची भावना रुजण्यास मदत होते. तसेच त्यांना शिक्षकांबद्दल ओढ देखील वाटते. शिक्षकांना त्यांच्या लिंगानुसार ‘सर’ आणि ‘मॅडम’ संबोधने बंद करून भेदभाव संपवावा अशी मागणी एका व्यक्तीकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फी जावेदला मुंबई पोलिसांकडून नोटीस; आज होणार चौकशी