ड्रामा क्वीन ( Drama Queen) म्हणून राखी सावंतची सर्वदूर ओळख आहे. सतत चर्चेत असणाऱ्या राखी सावंतची बॉलिवूड मध्ये एक आगळी वेगळी ओळख आहे. मराठी बिगबॉसच्या नुकत्याच झालेल्या सिझन मधून बाहेर पडल्यापासून राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. राखीचा ( Rakhi Sawant) पती आदिल खान यावर राखीने गंभीर आरोप केले होते. तो सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर मारहाण, फसवणूक व अश्लील व्हिडिओ बनवण्याचे आरोप आहेत.
शेतातील पक्षी त्रास देतात म्हणून शेतकऱ्याने केला ‘हा’ देसी जुगाड; एकदा व्हिडीओ बघाच…
त्यानंतर आता राखीने आदिलबद्दल मोठा खुलासा केला आहे. नुकतंच विरल भय्यानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी राखी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत आहे. यावेळी आदिलबद्दल बोलताना राखी म्हणाली, “मला तो जेलमधून फोन करून गयावया करत आहे. मला तुझ्याबरोबर संसार करायचा आहे. मला परत यायचं, मला एक संधी दे.” असं आदिल मला म्हणत आहे.
मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून आदिल खान आणि राखी यांचे वाद सुरु आहेत. त्याचबरोबर आदिलवर एका इराणी तरुणीने मैसूरमध्ये बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत चांगल्याच वाढल्या आहेत. आता आदिल सध्या जेलमध्ये आहे.