आदित्य ठाकरेंचा सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल; म्हणाले, “मागच्या दिड वर्षात…”

Aditya Thackeray attack on ruling party; Said, "In the past year and a half..."

नागपूर येथे सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये रोज नवीन मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी होत आहे. दरम्यान या अधिवेशनात दिशा सालीयान मृत्यु प्रकरण पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. दोन-अडीज वर्षे होऊन देखील अजूनही दिशा सालीयान प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होत आहेत. दरम्यान विधिमंडळात सत्ताधारी पक्षाने दिशा सालीयान मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी. अशी मागणी उचलून धरण्यात आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

धक्कदायक! सिक्कीममध्ये लष्कर गाडीचा अपघात होऊन १६ भारतीय जवानांचा मृत्यू

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी काल ( दि.22) दिले. दिशा सालीयन या अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मॅनेजर होत्या. 8 जून 2020 रोजी मुंबईत त्यांचा बालकनीमधून खाली पडून मृत्यू झाला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली. मात्र दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. यामध्ये आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) यांचा संबंध आहे का ? याचा तपास व्हावा अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली होती.

कोरोनाने घातले थैमान! राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरात आजपासून मास्क सक्ती

यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी थेट सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे. “मागील अडीच वर्षात मी असं बघितलं नाही. अधिवेशनात सत्ताधारीच येऊन आंदोलन करतात. सभागृहाचं कामकाज लहानपणापासून बघत आलोय, असा गोंधळ कधी पाहिला नव्हता,” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. तसेच महापुरुषांचा अपमान करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून हे प्रयत्न केले जात आहेत. असे मत आदित्य ठाकरेंनी मांडले आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमवाद आणखी भडकणार? कर्नाटकच्या विधानसभेत सीमावादावर घेतला ‘हा’ निर्णय

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *