
ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली असून ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने ठाणे या ठिकाणी जनप्रक्षोभ मोर्चा काढला. यावेळी मोर्चामध्ये बोलताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांची नक्कल देखील केली आहे.
“हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही तर काही तासांच….”, आदित्य ठाकरे यांचं भाकीत
भाषणाच्या वेळी आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा शर्ट झटकलं नंतर मान हलवली आणि दाढीला हात लावत एकनाथ शिंदे यांची नक्कल काढली. यांनतर कार्यकर्त्यानी वन्स मोर अशी घोषणा दिल्याने आदित्य ठाकरे यांनी दोनदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केली. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
धक्कादायक घटना! ऊस तोडीतील अल्पवयीन मुलीवर मुकादमाच्याच मुलाने केला बलात्कार
दरम्यान, यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही. तर काही तासांचं आहे. त्यामुळे आमचं सरकार आल्यानंतर गद्दार गँगचे जे अधिकारी आहेत त्यांच्याविरोधात बदल्याच्या भावनेतून नव्हे तर लोकांसाठी आम्ही चौकशी करु आणि जेलभरु. त्यांना जेलमध्ये टाकू, असा असा गंभीर इशारा यावेळी भाषण करताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिला आहे.
बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही, आमदार रोहित पवार यांनी केला मोठा दावा