ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची लूट झाली असून निःपक्ष चौकशीची मागणी देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. यानंतर आता राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नवऱ्याला सुट्टी मिळत नाही म्हणून बायकोने केलं थेट झोपून ठिय्या आंदोलन!
आता याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “ राऊतांनी राहुल कुल यांच्यावर केलेल्या आरोपांवर सरकारनं बोलावं. ते करतात ते सामान्यांसाठी असतं आणि आम्ही करतो ते राजकीय असतं का?. असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केलाय.
नाटू नाटू गाण्याला ऑस्कर अवॉर्ड मिळताच अमोल कोल्हेंचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, समोर आलेल्या भ्रष्टाचारावर सरकारकडून स्पष्टीकरण गरजेचं आहे. सर्व मंत्र्यांना कामाशी काहीही देणंघेणं नसून फक्त त्यांच्या खुर्चीशी देणंघेणं आहे. म्हणून त्यांच्याकडून असं वर्तन होत असल्याचं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथमध्ये दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू