राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “महापुरुषांचा अपमान…”

Aditya Thackeray reacts after Governor's resignation; Said, "Insult to great men..."

मागच्या काही दिवसापुर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती. यांनतर नवीन राज्यपाल कोण असणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. याबाबत अनेक चर्चा चालू होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस नेमके कोण आहेत? वाचा याबद्दल सविस्तर

त्यामुळे आता रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता कोश्यारी यांनी राजीनामा देताच विरोधकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. आता यावर आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळाले नवीन राज्यपाल, रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती

याबाबत एक ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी लिहिले की, “महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाही आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्याला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही”. असे ट्विट करता आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रेकिंग! पुण्यातील नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात, कंटेनरने दिली चार वाहनांना जोरदार धडक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *