मुंबई शिंदे गटाचं बंड झाल्यापासून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा वाद पहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. शिंदे गटातून ठाकरेंवर आणि ठाकरे गटातून शिंदे गटाला लक्ष्य केलं जात आहे. आता मात्र ह्या गोष्टीमुळं ठाकरेंना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी लॉजवर टाकली धाड सापडली कॉलेजची मुलगी; समोर आलेली माहिती वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
बंड झाल्यापासून शिंदे गटातील प्रत्येकाला गद्दार, पन्नास खोके एकदम ओके असे अनेक शब्द अनेकवेळा शिंदे गटातील प्रत्येक आमदारासाठी वापरला केला. सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये काही नेत्यांमध्ये कामालीचं वाकडं झाल्याचं पहायला मिळत आहे. नुकताच पार पडलेल्या अधिवेशनामध्येदेखील मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मिंधे किंवा विधानसभेबाहेर ‘पन्नास खोके एकदम ओके’ असं जे बोललं जात ते कितपत योग्य आहे? हा सवालदेखील शिंदेंनी केला होता.
मुंबई लोकलमध्ये जोडप्याने सर्वांसमोर केलं किस अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पाहा Video
ठाकरे गटाकडून होत असलेल्या या सगळ्या टिकेच्या संदर्भात शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत संदर्भात एक याचिका दाखल केली होती.
सावधान! चिकन खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा
या याचिकेच्या संदर्भात आता लवकरच पुढील सुनावणी होणार आहे. त्या सुनावणी मध्ये मात्र ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहे त्यांना यामध्ये समन्स बजावण्यात आलेले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरदेखील ठाकरें आणि राऊतांनी टिका केली होती. त्याचविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.