युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या 50 खोके एकदम ओक्के या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या दरम्यान त्यांनी जेजुरी येथील खंडोबाचे ( Jejuri Darshan ) दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी गडावर भंडारा खोबऱ्याची उधळण करून एक मन वजनाची प्राचीन तलवार देखील उचलली. यावेळी जेजुरीमधील कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत केले.
“..अरे, ही तर पापा की परी”, मॅडमचे ड्रायव्हिंग स्किल्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! पाहा VIDEO
काल (दि.9) आदीत्य ठाकरे यांनी जेजुरी येथे दर्शनासाठी उपस्थित राहिले. यावेळी आमदार सचिन अहिर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, हवेली शिवसेनाप्रमुख संदीप धाडसी मोडक, तालुकाप्रमुख अभिजित जगताप, जेजुरी प्रमुख किरण डावलकर, डॉ. प्रसाद खंडागळे यांनी आदित्य ठाकरे यांचे आतषबाजी करत व घोषणा देत स्वागत केले.
मोठीबातमी! दिपाली सय्यद करणार शिंदे गटात प्रवेश
यावेळी आदित्य ठाकरे यांनी जेजुरी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून गडाकडे प्रस्थान केले. गडावर गेल्यानंतर त्यांनी मुख्य मंदिरात खंडोबाची पूजाअर्चा केली. दरम्यान खंडोबा देवस्थानाकडून आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) यांना खंडोबाची प्रतिमा भेट देण्यात आली. गडावर उपस्थित पत्रकारांना त्यांनी कोणत्याही राजकिय प्रश्नांची उत्तरे न देता फक्त दर्शनाला आल्याचे सांगितले.
सावकाराच्या त्रासाला कंटाळून घरातील पाच सदस्यांची आत्महत्या; वाचा सविस्तर