Site icon e लोकहित | Marathi News

आदित्य ठाकरेंचे एकामागून एक वार सुरूच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले नवीन आव्हान

Aditya Thackeray's blows continue one after the other! A new challenge was given to Chief Minister Eknath Shinde

मागील काही दिवसांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. परवाच ( दि. 5) त्यांनी ‘हे सरकार फक्त होर्डिंग्ज वाल्यांचे कर्ज फेडत आहे.’ अशी टीका केली होती. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक आव्हान देत डिवचले आहे.

‘आय एम सॉरी…लव्ह यू मम्मी’ म्हणत बारावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. यानंतर वरळीतून आपल्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी. असे आव्हान नुकतेच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. हे चॅलेंज देऊन काही दिवस पलटतायत तोच आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) आणखी एक आव्हान दिले आहे.

चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये वंचितची उडी; बंडखोर राहुल कलाटे यांना आंबेडकरांचा पाठिंबा? चर्चांना उधाण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या आव्हानाला घाबरले आहेत. त्यांना मी दुसरं आव्हान देतो, तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी सुद्धा राजीनामा देतो. मी ठाण्यात येतो. तिथे लढून दाखवतो, बघू कोण जिंकून येतंय? एकदा होऊनच जाऊ द्या “, असे नवीन आव्हान आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ( Eknath Shinde) दिले आहे.

मोठी बातमी! आदिल खान दुर्रानीला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात, राखीने दाखल केली तक्रार

“विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीमध्ये एक चित्र स्पष्ट दिसत आहे. महाविकास आघाडीने गरुडझेप घेतलेली आहे. मी बोलतो आज निवडणुका घ्या. बघुया कोण जिंकतंय. मी काही सुरतला पळून जाणार नाही. गद्दारी कोणाला पटली नाही. ४० गद्दार सुरतला गेले आहेत. तिथून गुवाहाटी, तिथून गोवा. त्यांच्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. मात्र खोके एकदम ओके सुरुय! ” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला आहे.

“स्वतःला पद, पैसा, सत्ता मिळणार असेल तर…”, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे जितेंद्र आव्हाडांवर टीकास्र!

Spread the love
Exit mobile version