
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक देखील करण्यात आली. यांनतर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया देत शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा खर्च; वाचून डोळे फिरतील
महालगाव (Mahalgaon) येथे काल आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक या दोन्ही गोष्टी एकाचवेळी झाल्या यामुळे रमाईंचा कार्यक्रम बंद करण्यात आला. त्यामुळे डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.
माध्यमांशी बोलतानाच चक्कर येऊन पडली राखी सावंत; पाहा VIDEO
दरम्यान, महालगाव या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम चालू असताना त्याच्याच बाजूला रमाबाई यांची जयंती साजरी केली जात होती. आदित्य ठाकरे यांची सभा सुरु असल्याने रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त सुरु असलेला डीजे आणि मिरवणूक थांबवण्याची विनंती पोलिसांनी भीमसैनिकांना केली. यावेळी भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने देखील किरकोळ दगड स्टेजवर फेकले.