Sushma Aandhare: “आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा केवळ बालीश चाळे”, शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

"Aditya Thackeray's marriage issue is childish", Shiv Sena's Sushma Andhare attacks opponents

मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aadity Thakreay )यांच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम (Ramdas kadam) यांनी टीका केली आहे. दरम्यान टीकेला शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Aandhare)यांनी थेट अमृता फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत निशाणा शाधला आहे. तसेच अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )समर्थक गटाचा उल्लेख ‘मिंधे सेना’ असा केला आहे.

Rohit Pawar: ” तरुणांच्या संतापाचा स्फोट होण्यापूर्वी…”, रोहित पवारांचा राज्य सरकारला गंभीर इशारा

“आदित्य ठाकरेंच्या लग्नाची काळजी करायला त्यांचे आई-वडील समर्थ आहेत. मिंधे सेनेनं त्याची काळजी करण्याची गरज नाही. अमृताजी (Amruta Fadanvis) पक्षात नसतानासुद्धा त्यांचं मॉडलिंगचं करियर सोडून इकडे येत आहेत त्याबद्दल आम्ही कधी चिंता व्यक्त केली नाही? काय गरज आहे त्यांचे पती मुख्यमंत्री असताना त्यांच्यासाठी पोलिसांना वेठीस ठरुन शोची विक्री करायची मेहनत घेत होते ना? ते समर्थ आहेत ते करायला. ज्याच्या त्याचा प्रश्न ज्याला त्याला सोडवू द्यावा की नाही?” असा प्रतिप्रश्न केला.

Nirmala Sitaraman: आजपासून भाजपच्या ‘मिशन बारामती’ला सुरुवात, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज पुणे दौऱ्यावर

पुढे अंधारे यांनी बोलताना पंतप्रधानांचाही उल्लेख केला. “हे बघा मोदींचं (Pm modi) लग्न झालं. त्यांची काही अडचण होती. म्हणून ते विभक्त झाली. मग हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मोदीजींच्या निर्णयाचा आपण सन्मान केला पाहिजे. मोदीजींच्या या निर्णयामुळे त्यांच्या कामावर कसं काय प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं?” असा प्रश्न अंधारे यांनी विचारला.

“आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा केवळ बालीश चाळे आहेत,” अस म्हणत बाळासाहेबांच्या विधानाचा संदर्भही दिला आहे.
“बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं ना तर आदित्यच्या लग्नाची काळजी घ्यायला त्याचे मायबाप खंबीर आहेत. त्यासाठी रामदास कदमांनी उगाच आपलं वधूवर सूचक मंडळ घेऊन लुडबुड करु नये. आम्ही खंबीर आहोत त्यासाठी,” असं अंधारे यांनी म्हटलं.

Raju Srivastav Death: मोठी बातमी! कॉमेडीयन राजू श्रीवास्तवचे निधन

तसेच पुढे बोलताना अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा प्रश्न काढून तुम्हाला वेदान्त फॉक्सकॉन परत आणता येणार आहे का? तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येणार आहेत का? सध्या जे काही महिला असुरक्षित असल्याचं वातावरण आहे ते सोडवता येणार आहे का?” असे प्रश्नही विचारले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *