मुंबई : दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकारण चांगलाच तापलंय. मुंबई मनपाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही.हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे. पण आता तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशाबाबत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) स्पष्टीकरण दिलय.
Pune: उद्यापासून पुण्यातील ‘ही’ बँक होणार कायमची बंद, कारण…
आदित्य ठाकरे म्हणाले, “तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे राजकारणात येणार नाहीत यासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या आहेत. त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. तेजस ठाकरे हे सद्या त्यांच्या वाईल्ड लाईफच्या (Wild life) कामात व्यस्त आहेत”, अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाने न्यायालयाकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आपल्या अर्जावर निर्णय देण्याची मागणी केली आहे. मुंबई महानगरपालिका आम्हाला परवानगी देणार नाही, त्यामुळे आमच्या अर्जावर मुंबई महानगरपालिकेला तातडीने निर्णय देण्याचे आदेश द्या, अशी आमची मागणी आहे. अशी विनंती ठाकरे गटाने न्यायालयाकडे केली आहे.
Sugar factory: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच होणार सुरू