मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या युतीमुळे कोणाला फायदा होणार याबाबतीत तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपकडून या युतीबाबत जोरदार टीका केली जात आहे. भाजपचे अनेक नेते या युतीसंदर्भात प्रतिक्रिया देत आहेत. आता यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी “विनाशकाले विपरीत बुद्धी”, सूचक टीका केली होती. आता देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) प्रत्युत्तर दिले आहे.
Asia Cup 2022: उद्या भारत- पाकिस्तानमध्ये रंगणार सामना, कोण बाजी मारणार?
देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, “शिवसेनेनं भूमिका सोडलेली नाही. शिवसेनेची भूमिका कायम स्पष्ट राहिलीये. गेल्या अडीच वर्षांत देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्याच आधारावर एकत्र आलो आणि सोबत राहिलोत . ज्यांना आमची भूमिका मान्य असेल, ते सोबत येतील”.
Eknath Shinde: मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्या गणेशभक्तांना ताप्तुरता टोल फ्री, कारण…
काय म्हणाले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले, “मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी”, अशा सूचक शब्दांमध्ये फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर, यावेळी फडणवीसांनी शिवसेनेचा दसरा मेळावा आणि गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिट्ठी या मुद्द्यांवरदेखील स्पष्ट भाष्य केलं.
Uday Lalit: मोठी बातमी! कोकणच्या उदय लळीत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ