मुंबई : महाराष्ट्रातील वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यापासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत आहेत. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांची रोजगार संधी गुजरातला गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे सतत करत आहेत.
शनिवारी रात्री मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक! काय असेल बैठकीचं कारण?
आता याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे वडगाव-मावळ परिसरामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या माध्यमांतून आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधलाय. आता भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. जनआक्रोश मोर्चाबाबत प्रतिक्रिया देत पडळकर म्हणाले, “आदित्य ठाकरेंची अवस्था ‘बैल गेला आणि झोपा केला” अशी झाल्याची जहरी टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलताना असे म्हणाले.
पीएम किसान लाभार्थ्यांची चिंता वाढली! 12 वा हप्ता दिवसेंदिवस लांबतोय, कारण…
पुढे पडळकर म्हणाले, घरामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री पद होते आणि ते स्वत:ही कॅबिनेट मंत्री होते. पण जेव्हा महाराष्ट्रामधील लोकांना त्यांच्या आधाराची गरज होती, लोकांना ऑक्सीजन बेड मिळाले नाहीत,अनेकजण मृत्यू पावले, ज्यावेळी लोकांना गरज होती त्यावेळी घरातून बाहेर पडले नाहीत आणि आता सगळं त्यांच्या हातून गेलं असताना ते लोकांमध्ये जातयेत. याचा त्यांना काही उपयोग होणार नाही, असं मला वाटतय, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी दिलीये.
सातारा जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीवर लम्पी रोगाचा परिणाम, बैलांच्या बाजार आणि प्रदर्शनाला बंदी