
शिरूर: दि.24 रांजणगाव (सां) येथील तरुणांच्या माध्यमातून अन्नदान हेच श्रेष्ठ दान या संकलपनेतून दिवाळी फराळ वाटप व वृक्षारोपण रोपण कार्यक्रम. मा. सरपंच कु. स्नेहल संजय काळभोर (महाराष्ट्रातील सर्वात तरुण सरपंच, आदर्श युवा सरपंच खडकी ग्रामपंचायत ता.दौंड ) यांच्या हस्ते पार पडला.
शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत साजरी केली दिवाळी, पंधरा दिवसांत सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी
आर्थिक परिस्थितीमुळे अनेक लोक दिवाळी साजरी करु शकत नाहीत त्यांच्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून रांजणगाव (सां) येथील तरुणांनी एकत्रित येऊन गोरगरीब व ऊसतोड कामगारांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून दिवाळीच्या दिवशी मिठाई, फराळ, तसेच लहान मुलांना फटाके वाटप केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम मा. सरपंच कु. स्नेहल संजय काळभोर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी येथील युवकांनी केलेल्या कामाचे कौतुक करून ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू; ऐन दिवाळीत कुटुंबावर पसरली शोककळा
या कार्यक्रमावेळी मयुर (सर) रणदिवे, ओंकार (भैया) रणदिवे, प्रतीक्षा तांबे, ओंकार सुखदेव राक्षे, अनिकेत सुभाष राक्षे, स्वप्नील शरद रणदिवे, वैभव प्रवीण शितोळे, जयदीप राजे निंबाळकर, मयुर मेगडे, पै. उमेश रमेश रणदिवे (वृक्षप्रेमी), विशाल जालिंदर रणदिवे आदी उपस्थित होते.
तरुणांनो सावधान! आता ‘आयटम’ शब्द वापराल तर येईल होईल शिक्षा; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?