डुक्कर म्हंटले की अनेकजण तोंड वेंगाडतात. मात्र आजकाल डुक्कर पालनातून लाखोंची कमाई केली जात आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु, एक 18 वर्षाच्या मुलगी अभ्यासासोबत डुक्कर पालनाचा व्यवसाय करून लाखो रुपये कमवत आहे. या मुलीचे नाव नम्रता असून ती गुवाहाटी येथे राहते. ती सध्या माध्यमिक शिक्षण घेत असून अभ्यासात देखील हुशार आहे.
चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात! बडे-बडे नेते प्रचारासाठी मैदानात
नम्रताच्या वडिलांचा डुक्कर (Pig farming) पालनाचा व्यवसाय होता. यामुळे तिने देखील वडिलांना मदत करत या व्यवसायात रस दाखवला. यासाठी नम्रताने ICAR चे प्रशिक्षण घेतले आहे. नम्रताकडे सध्या 2 रानडुक्कर, 4 डुकरे आणि 12 पिल्ले आहेत. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मज्जा मस्ती न करता नम्रताने गुवाहाटी येथील पिग क्वीनवरील ICAR-नॅशनल रिसर्च सेंटरमधून डुक्कर पालन आणि कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण घेतले.
शेअर बाजारामध्ये पुन्हा घसरण; ‘या’ शेअर्सचे झाले मोठे नुकसान
या प्रशिक्षणामुळे नम्रता डुकरांच्या खाद्याचा खर्च कमी करू शकली आहे. तिने डुकरांना खाण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध राईस पॉलिश आणि फिश मार्केटचा कचरा वापरला. ती स्वतःला एक नवोदित कृषी-उद्योजक म्हणवून घेते. सध्याच्या काळात बहुतेक मुले पशुपालन व कृषी क्षेत्राकडे पाठ फिरवत असताना नम्रता हा व्यवसाय करत आहे. यामुळे तिचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल
मागच्या वर्षात नम्रताने 32 पिलांची विक्री केली आहे. त्यातून तिने 100,000 रुपये कमावले. तसेच पिलांच्या विक्रीतून 1,44,000 रुपये आणि दोन फिनिशर्सकडून 60,000 रुपये कमावले. या कमाईमुळे तिच्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक हातभार लागला आहे.
“लग्न कधी करणार?”, प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण सध्या…”