Ved । कौतुकास्पद! रितेश देशमुखच्या ‘वेड’निमित्त स्टार प्रवाह वाहिनीने केली अनोख्या विक्रमाची नोंद

Admirable! On the occasion of Riteish Deshmukh's 'Wade', Star Pravash channel recorded a unique record

Ved । मुंबई : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) ‘वेड’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. बॉक्स ऑफिसवर (Box office) या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील संवाद, गाणी आणि महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणजेच रितेश आणि जिनिलियाच्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. (Latest Marathi News)

Tomato Price Hike । नारायणगावचे टोमॅटो पुन्हा चर्चेत! किलोला मिळतोय ‘इतका’ भाव

प्रेक्षकांना आता प्रेमातला हा वेडेपणा पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. येत्या २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीने एक अनोखा विक्रम रचला असून विशेष म्हणजे या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही (Guinness World Records) झाली आहे. यावेळी रितेश देशमुखही उपस्थित होता.

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! कांद्याचे भाव क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी वाढले

स्टार प्रवाह वाहिनीने याच प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम रचला. ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १४४६ छत्र्यांचा वापर केला असून दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती पूर्णत्वास आली. विशेष म्हणजे या चित्रपटात सत्या आणि श्रावणीचे छत्रीसोबत वेगळं नातं असल्याने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी या छत्रीची निवड केली. (Star Pravah Set World Record)

Bhimashankar Temple । भीमाशंकरला दर्शनाला जाताय? एकदा ही नियमावली पहाच

“स्टार प्रवाह वाहिनीने वेड चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रचलेला हा विक्रम खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा क्षण अभिमानाचा असून स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जिनिलिया आभारी आहोत”, अशा शब्दात रितेश देशमुखने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Reserve Bank of India । मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने ‘या’ चार बँकांना ठोठावला दंड, केली मोठी कारवाई

Spread the love