![Admirable performance of the traffic police, shocked the stalled truck; Watch the video](http://elokhit.com/wp-content/uploads/2023/04/Viral-video-4.jpg)
ट्रॅफिक पोलिसांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही चांगले तर काही वाईट असे अनेक वेगेवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या देखील ट्रॅफिक पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक ट्राफिक पोलिसांचे कौतुक करत आहेत.
“एक्स गर्लफ्रेंड पाहून जळत असेल” आकाश ठोसरच मोठ वक्तव्य
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अचानक ट्रक रस्त्यात रात्रीच्या वेळी बंद पडला. त्यामुळे ट्रॅफिक होऊ लागलं. ही कोंडी सोडवण्यासाठी स्वत: ट्रॅफिक पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ट्रकला धक्का मारला आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला नेल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पुणे ट्रॅफिक पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
“एक्स गर्लफ्रेंड पाहून जळत असेल” आकाश ठोसरच मोठ वक्तव्य
हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत लिहिण्यात आले आहे की, “अनपेक्षित अडथळ्यांमुळे अडचण निर्माण होऊ शकते, परंतु जलद विचार आणि “टीम-वर्क” सह परिस्थिती हाताळता येऊ शकते. भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार व स्थानिक नागरिक यांचे कौतुकास्पद काम” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून लोक ट्रॅफिक पोलिसांचं कौतुक करत आहेत.
अनपेक्षित अडथळ्यांमुळे अडचण निर्माण होऊ शकते, परंतु जलद विचार आणि "टीम-वर्क" सह परिस्थिती हाताळता येऊ शकते.
— Pune City Traffic Police (@PuneCityTraffic) April 4, 2023
भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार व स्थानिक नागरिक यांचे कौतुकास्पद काम…! pic.twitter.com/hsvuobQhaf