
आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ३९३ वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठया उत्साहात साजरी होत आहे. आज जयंतीच्या निमित्ताने अनेक शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर जाऊन वेगेवेगळ्या मोहीमा राबवत आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये गहू पीक (wheat crop) उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकृती साकारली आहे. सध्या याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होताना दिसत आहे.
४४० व्होल्टचा करंट देण्याच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले..
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावातील एका युवा शेतकऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांची अनोखी प्रतीकृती साकारली आहे. कुणाल विखे (Kunal Vikhe) असं या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. शिवरायांची रांगोळी काढून त्यामध्ये गव्हाचे दाणे टाकले आणि आज तीच प्रतीकृती पाहून कुणाल विखे यांचं सगळे कौतुक करत आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी केली आगळीवेगळी मागणी; म्हणाले…
माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रतीकृतीची लांबी 24 फूट आहे आणि रुंदी 18 फूट आहे. यासाठी 10 किलो गव्हाच्या बियाणांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती युवा शेतकऱ्याने दिली आहे. सध्या या शेतकऱ्याचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरून या युवा शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे.
मोठी बातमी! गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक; समोर आली मोठी अपडेट