मागील काही दिवसांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतत आव्हाने देत आहेत. आता याच पार्शवभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Mla Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियानांतर्गत सरकारने स्वीकारले बालकांचे पालकत्व
आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, आदित्य ठाकरे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये (Mental Hospital) भरती करण्याच्या सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार आहे. असं विधान तानाजी सावंत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यममंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सतत आव्हाने देणाऱ्या आदित्य ठाकरे यांची मानसिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करू असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. सावंतांच्या या वक्तव्यांनंतर नवीन वादाला तोंड फुटले असून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत
ब्रेकिंग! पुन्हा एकदा राजकीय भुकंप, ‘इतके’ आमदार करणार शिंदे गटामध्ये प्रवेश