Afghanistan Earthquake Video । अफगाणिस्तानमध्ये हाहाकार! भूकंपामध्ये २ हजार जणांचा मृत्यू, हजारो जखमी; पाहा धडकी भरवणारी दृश्ये

Afghanistan Earthquake Video

Afghanistan Earthquake Video । अफगाणिस्तान मध्ये 6.3 रजिस्टर स्केलचा भूकंप झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान हादरले आहे. या विनाशकारी भूकंपामुळे इमारती जमीन दोस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर अनेक नागरिक देखील यामध्ये मृत्यू पावले आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तान मध्ये भूकंपामुळे आतापर्यंत २ हजार जणांचा मृत्यू झाला आहे तर हजारो नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Success Story। शेतकरी दाम्पत्याचा अनोखा प्रयोग! मेहनतीच्या जोरावर रानभाजी लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

त्याचबरोबर या ठिकाणी शोध आणि बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पश्चिम अफगाणिस्तान मध्ये शनिवारी भूकंप झाला असून यामध्ये मोठी जीवित हानी झाली आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या जवळपास 2000 च्या पुढे गेली आहे.

Gadchiroli Farmer News । धक्कादायक बातमी! शेतकऱ्यांनी दिला संपुर्ण कुटुंबांसह आत्मदहनाचा इशारा; नेमकं कारण काय?

पाहा धडकी भरवणारी दृश्ये

Spread the love