मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) ही फेसबुकवर कायमच सक्रीय असते. केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे (controversial statements) नेहमी चर्चेत असते. केतकी नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. केतकीच्या त्या पोस्टमुळे तिला तुरुंगवास (jail) भोगावा लागला होता.
मित्राच्या वाढदिवसानिमित्त फिरायला जाणे पडले महागात, धबधब्याच्या पाण्यात बुडून चार मित्रांचा मृत्यू
दरम्यान आता पुन्हा एकदा केतकीची पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. नुकतंच तिने तिच्या फेसबुकवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये केतकी एका समुद्र किनाऱ्यावर पाय मोकळे करुन बसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला सागरा प्राण तळमळला हे गाणे वाजत आहे. इतकंच नाही तर तिने या व्हिडीओला कॅप्शनही दिले आहे.
दिलासादायक! पुढील ४८ तासांत मिळणार मान्सूनपासून सुटका
दरम्यान याआधी केतकिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यावेळी तिला ४१ दिवस तुरुंगात जावं लागल होत. इतकंच नाही तर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केतकीच्या विरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एक मुलाखत दिली होती. या मुलाखतींमध्ये केतकिने तिच्यासोबत घडलेला प्रकार बेकायदेशीर असल्याचं म्हटल होत. तसेच तुरुंगातून बाहेर आल्यावर केतकीने ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली होती.
दौंड तालुक्यातील बाप-लेकाची कमाल, खेकड्याची शेती करून मिळवतायेत लाखो रुपये