“पवार कुटुंबावर आरोप केल्यानंतर…”, लवासाप्रकरणावर अजित पवार यांनी दिली पाहिली प्रतिक्रिया

"After accusing the Pawar family...", Ajit Pawar's reaction to the Lavasa case has been seen

अनेक काळापासून रखडलेल्या लवासा प्रकरणी शरद कुटुंबियांना लवलरच धक्का बसणार आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्यात आली असून यामध्ये शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात यावेत. अशी मागणी करण्यात आली आहे. नानासाहेब जाधव (Nanasaheb Jadhav ) यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. आता या प्रकरणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांना हवी ‘अशी’ पत्नी; म्हणाले मला…”

लवासामधील सर्व गोष्टी या पारदर्शक पद्धतीने झालेल्या आहेत. प्रसिद्धीसाठी असे आरोप केले जात आहेत. त्यांना माहीत आहे पवार कुटुंबावर आरोप केल्यानंतर प्रसिद्धी मिळते. असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, जाधव यांनी दाखल केलेल्या या याचिकेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुबियांचे अतिशय निकटवर्तीय अजित गुलाबचंद यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे.

राहुल गांधी यांना हवी ‘अशी’ पत्नी; म्हणाले मला…”

पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा हिलस्टेशन प्रकल्पाबाबत (Lavasa Hillstation project) याचिका कर्त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. मात्र, तरीही त्यांनी तक्रार देण्यात बराच उशीर केला असल्याचे निरीक्षण तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी नोंदवले होते. यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 26 फेब्रुवारी 2022 रोजी हायकोर्टाने लवासा प्रकल्पाविरोधातील मूळ याचिका निकाली काढली होती.

मोठी बातमी! श्रीगोंदा-पुणे बसचा भीषण अपघात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *