
Ajit Pawar । 30 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, आणि मिझोरम या पाच राज्यांतील मतदान प्रक्रिया (Assembly Election Result 2023) पार पडली. सर्वजण निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. भारतीय जनता पक्षाला (BJP) या तीन राज्यांमध्ये मोठी आघाडी मिळाली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसला (Congres) विजय मिळाला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
Urfi Javed । उर्फीला बसला मोठा धक्का! इंस्टाग्राम अकाउंट झालं सस्पेंड
“देशाला नरेंद्र मोदींशिवाय (Narendra Modi) दुसरा पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आम्ही घेतलेली भूमिका काही लोकांना पटलेली नाही. तेलंगणामधील केसीआर राव (KCR) हे महाराष्ट्रात फिरले, तसेच त्यांनी देशाच्या सर्व टीव्ही चॅनलवर जाहिराती दिल्या. आताच्या निकालावरुन त्यांची परिस्थिती बिकट असल्याचे दिसते. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही भागात भाजपच येईल असं चित्र निकालावरून पाहायला मिळत आहे,” असे अजित पवार म्हणालेत. (Ajit Pawar on Assembly Election)
दरम्यान, राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता काँग्रेसला गमवावी लागत आहे. मेघालय सोडून इतर चार राज्यांचा आज निकाल असून मेघालयची मतमोजणी सोमवारी होणार आहे. ही निवडणूक म्हणजे 2024 ची (Loksabha 2024) सेमीफायनल म्हटली जात आहे. पाचपैकी तीन राज्यात भाजपाची सत्ता आल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Crime News । धक्कादायक! शिपायाने अल्पवयीन मुलीवर केला वारंवार बलात्कार, गर्भवती केलं अन्…