
शेतामध्ये दिवस रात्र कष्ट करून शेतकऱ्याचे पीक चांगल्या प्रतीचे न आल्याने शेतकरी नैराश होतो. परंतु मराठवाड्यातल्या हिंगोली ( Hingoli ) जिल्ह्यामधील एका शेतकऱ्याने आज सकाळी घरातील सोने मोडून कृषी कार्यालयामध्ये पैसे उधळले. बोगस खताचे प्रकरण ( A case of bogus fertilizer ) हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाजत होते. यावर कृषी कार्यालयामध्ये तक्रार करून देखील कंपनीवर कारवाई केली जात नव्हती.
त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने घरामधील सोने मोडून कृषी कार्यालयावर टोपलीभर पैसे उधळले. ही कंपनी बोगस माल विकत असल्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र कृषी कार्यालयाने दरवेळी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी वैतागले होते. संतापलेल्या मंगेश साबळे यांनी आज सकाळी टोपलं भरुन नोटांचे बंडल हिंगोली कृषी अधीक्षक कार्यालयात ( Office of the Superintendent of Agriculture ) उधळून टाकले.
RCB च्या पराभवानंतर धक्कादायक ट्विट; “ऋषभ पंतच्या जागी शुभमन गिलचा अपघात…”
संपूर्ण राज्यभरात ही कंपनी विषारी खतांची विक्री करत आहे. परंतु तरीदेखील या कंपनीकडे सर्व अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषीमंत्री अब्दुल सतार ( Guardian Minister and Agriculture Minister Abdul Sattar ) आहेत. अब्दुल सत्तार यांना नामदेव पतंगे यांनी याप्रकरणी लक्ष देण्याची मागणी केली होती.
Eggs | अंडे शाकाहारी की मांसाहारी? शेवटी प्रश्नाचं उत्तर मिळालंच…
त्यानंतर अधिकारी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार देखील करत म्हणून वैतागलेला मंगेश साबळे यांनी पंचायत समितीसमोर पैसे उधळत अनोखे आंदोलन केले आहे. दरम्यान मागच्या काही दिवापूर्वी एका तरुण शेतकऱ्याने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीसमोर दोन लाख रुपयांची उधळण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल झाला होता.
भर लग्न मंडपात नवरा-नवरीची एकमेकांना तुफान मारहाण, व्हिडिओही झाला व्हायरल; पाहा Video