राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आमदारांसह आज गुवाहाटीसाठी गेले आहेत. गुवाहाटीला महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचे केंद्र बिंदू मानले जात आहे. माहितीनुसार गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले आहे. दर्शन घेतल्यांनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सोशल मीडियावर अफवा पसरवताय तर सावधान! अन्यथा होऊ शकते आजन्म कारावासाची शिक्षा
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “आज कामाख्या देवीच दर्शन घेतलं, देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील संकट दूर व्हावं. शेतकऱ्यांसह सर्वाना सुख मिळावं यासाठी आम्ही आलोय. असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी तीन मंत्र्यांना पाठवलं होतं त्याबद्दल आसाम सरकारचे धन्यवाद. असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
अरे वा! रानडुकरांना शेतातून पळवण्यासाठी शेतकरी पुत्राने केली वेगळी आयडिया; वाचा सविस्तर
पुढे मुख्यमनातरी एकनाथ शिंदे म्हणाले की, आसाम सरकारच्या सहकार्याबद्दल त्यांचे धन्यवाद. कामाख्या देवीचं मंदिर हे आसाममध्येच आहे. देवीच्या आशीर्वादामुळे आसामच्या जनतेलाला देखील सुख मिळेल, असं देखील मुख्यमनातरी शिंदे यावेळी म्हंटले आहेत.
“हे माता कामाख्या देवी..”, शिंदे गटापूर्वी रोहित पवारांची कामाख्या देवीला प्रार्थना