Site icon e लोकहित | Marathi News

लग्नाच्या तब्बल आठ वर्षांनंतर नवऱ्याने बायकोला सांगितले मोठे सत्य; ऐकून बायकोलाही बसला धक्का, अन् मग..

After eight years of marriage, the husband told his wife the big truth; The wife was also shocked to hear, and then..

सध्या देशात विवाहबाह्य संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहे. या वाढत्या घटनांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील प्रचंड वाढले आहे. अशा घटनांमुळे अनेक पती-पत्नीच्या नात्यात संशय ही वाढत चालला आहे. या संशयामुळे नात्यात दुरावा देखील येत आहे. पतीचे अनैतिक संबंध माहित पडल्यानंतर पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Marathi Movies | “…म्हणून मराठी सिनेमा चालत नाही”, अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते धक्कादायक कारण

१३ मे रोजी जय भवानीनगर गल्ली क्र. ११ येथील रहिवासी शुभांगी विनोद काळे (वय २६) या विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पती विनोद विश्वनाथ काळेने शुभांगीला काही धमक्या दिल्याचे सांगितले जात आहे. तो म्हणाला, माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, तू मला अडचण होत आहे. त्यामुळे तू स्वतः मर नाहीतर मारून टाकेल. असे म्हणत त्याने शुभांगीला बेदम मारहाण केली.

Murder case | विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी प्रेयसीचा खून; गुगल सर्चमुळे गुन्हेगार अडचणीत!

हा सर्व प्रकार काळे कुटुंबीयांना माहीत होता. सासरचे मंडळी शुभांगीला मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित नोकरदार विवाहित महिलेने बेडरूम मधील फॅनला गळफास घेतला. याप्रकरणी मृत महिलेच्या आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Co-operative Banks | राज्यातील २० टक्के सहकारी बँकांचे घोटाळे चव्हाट्यावर; दंडात्मक कारवाईमध्ये महाराष्ट्र टॉपला

पती विनोद काळे, दीर विजय काळे, जाऊ नर्मदा काळे, सासरे विश्वजीत काळे आणि सासू सुमनबाई काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोज रात्री उशिरापर्यंत पती फोनवर बोलत असल्यामुळे शुभांगीने त्याची विचारपूस केली. त्यानंतर हा वाद चिघळला. यापुर्वी दोन दिवस अगोदर पतीने शुभांगीला बेदम मारहाण केली होती. ‌

छोट्या कलाकारांचा मोठा धमाका, ‘द केरळ स्टोरी’ ने १३व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी; वाचून डोळे पांढरे होतील

मृत्त महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, शुभांगीचा विवाह २०१५ मध्ये झाला आहे. ती एकुलती एक मुलगी असल्यामुळे मोठ्या धुमधडाक्यात तिचा विवाह पार पडला होता. मात्र, तिला सासरच्या मंडळींकडून प्रचंड त्रास दिला जात होता. त्यामुळे या अगोदरही शुभांगीच्या माहेरच्या माणसांनी जावयासह त्याच्या आई वडिलांना अनेकदा समजून सांगितले होते.

Prithvi shaw ने हाफ सेंच्युरी ठोकल्यावर नाशिकच्या मुलीने केले गजब सेलिब्रेशन, तिने पृथ्वीसाठी खास….

Spread the love
Exit mobile version