Site icon e लोकहित | Marathi News

फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला निघाला, मोदींच्या हस्ते 30 ऑक्टोबरला होणार उद्घाटन

After Foxconn, another project in Maharashtra headed for Gujarat, to be inaugurated by Modi on October 30

मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील (Maharashtra) हजारो कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गुजरातला नेण्यात आला होता. हा वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातील दोन लाख युवकांना रोजगार देणार होता. यावरून मोठ्या प्रमाणात वाद देखील झाला होता. दरम्यान आता फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेला आहे. नागपूरला (Nagpur) होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट ( C-295 Military transport aircraft )हा प्रकल्प महाराष्ट्रातील नागपूरमध्ये होणार होता.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, पोलिस-तलाठीसह विविध पदांसाठी होणार ७५ हजार पदांची भरती

परंतु आता हा प्रकल्प गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प नागपूरला होणार असल्याचं सांगितलं होतं. महत्वाची बाब म्हणजे 30 ऑक्टोबरला वडोदऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्धाटन होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे लष्करी विमानाची निर्मिती खासगी कंपनीद्वारे केली जाणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. दरम्यान या प्रकल्पाचा एकूण खर्च 21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो.

अकोल्यातील तिरडीवरुन उठलेल्या तरुणाचे धक्कादायक आणि विचित्र वास्तव समोर

काय आहे हा C-295 प्रकल्प?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर 2022 रोजी ‘मेक इन इंडिया’ आणि देशांतर्गत विमान निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल उपस्थित राहणार आहेत. 8 सप्टेंबर 2021 रोजी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295एमडब्लू वाहतूक विमान खरेदी करण्यास मान्यता दिली होती.

‘या’ योजनेत करा गुंतवणूक, पाच वर्षात जमा होईल 14 लाखांचा निधी; वाचा सविस्तर

दरम्यान, त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने 24 सप्टेंबर 2021 रोजी, मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. सोबत संबंधित उपकरणांसह विमान संपादन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्ली येथे 27 ऑक्टोबर 2022 रोजी एका पत्रकार परिषदेत संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले की, या करारा अंतर्गत आता 16 विमाने उड्डाणासाठी सज्ज अशा स्थितीत वितरित केली जातील. तर 40 विमाने भारतीय विमान कंत्राटदार, टाटा समूह, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), टीएएसएलच्या नेतृत्वाखाली भारतात तयार केले जातील.

भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला, किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

Spread the love
Exit mobile version