
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा ‘लायगर’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट जास्त चालू शकला नाही. चित्रपट फ्लॉप झाल्याने विजयला देखील धक्का बसला आणि त्याने बरेच दिवस सोशल मीडियावर ब्रेक घेतला होता. ब्रेकनंतर आता खूप दिवसांनी विजयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची पोस्ट खूप चर्चेत आहे.
मोठी बातमी! लम्पी आजारामुळे जनावरे दगावल्यास शेतकऱ्यांना मिळणार मदत
विजय देवरकोंडाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून त्याचा एक फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “सिंगल प्लेअर”. शेअर केलेल्या फोटोमध्ये तो ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोवर चाहते वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत. अनेकजण कमेंट करत “वन मॅन आर्मी” असं देखील म्हणत आहेत.
‘लायगर’ हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित आहे. या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाची निर्मिती पुरी जगन्नाथ, करण जोहर आणि चार्मी कौर यांनी केली होती. या चित्रपटात अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन यांच्या देखील भूमिका होत्या. या चित्रपटाने फक्त ६६.८९ कोटी रुपये एवढीच कमाई केली आहे.
Nitin Gadkari: नितीन गडकरींनी दिला शेतकऱ्यांना सल्ला म्हणाले, “सरकारच्या भरवश्यावर राहू नका…”