मुंबई : राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप प्रणित शिंदे सरकार सत्तेवर आलं. मंत्रिमंडळ विस्तारही झाला. यापूर्वी तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडे असलेली शासकीय निवासस्थाने आत्ता भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांना मिळाली. मंत्र्यांचे अभिनंदन करायला कार्यकर्ते सरकारी बंगल्यात जमू लागले.. हॉल खच्चून भरला. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून, मंत्री महोदययांचा आनंद गगनात मावेना. त्याच आनंदाच्या भरात कार्यकर्त्यांबरोबर छायाचित्रे घेण्यात मंत्री दंग झाले.
इतक्यात मध्येच कोणीतरी ओरडले…!
अरेरे! आधी ते भिंतीवर फोटो बघा कुणाचे ..!
घोटाळा झाला…!
Uday Samant : उदय सामंत, यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी; वाचा सविस्तर
क्षणभर गर्दी शांत होऊन कार्यकर्त्यांची एकमेकांशी कुजबुज सुरू झाली.. साऱ्यांचे लक्ष मंत्र्यांच्या मागे असलेल्या भिंतीकडे गेले. सरकारी बंगल्यातल्या त्या भिंतीवरील काँग्रेस नेत्यांच्या भल्यामोठया प्रतिमा अवाक करणाऱ्या होत्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची छायाचित्रे पाहून काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. आता मात्र मंत्रिमहोदय सावध भूमिका घेऊन छायाचित्रे घेण्याची जागा बदलली…
Raj Thakarey: राज ठाकरे अँक्शन मोडवर, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून निवडले ‘हे’ पक्ष निरीक्षक
खरतर ही गंमत झाली कशी?
शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात ,भाजपमधील एका माजी मंत्र्याचाही मंत्री म्हणून नंबर लागला. त्या मंत्र्यांचे अभिनंदन करायला आलेल्या सर्व कार्यकर्त्यांशी व्यवस्थित संवाद साधता यावा. म्हणून कुठेतरी एकत्र जमायला हवं..! असे त्यांनी दुसऱ्या एका मंत्र्याला विचारले असता , एका जवळच्या कर्मचाऱ्याने अमुक मंत्र्यांचा बंगला रिकामा आहे, असे सांगितले. यापूर्वी त्या बंगल्यात ठाकरे सरकारमधील काँग्रेस मंत्री रहात होते. मग मंत्र्यांसह कार्यकर्त्यांचा ताफा मंत्रालयासमोरील त्या बंगल्यात शिरला. मग काय मंत्र्यांबरोबर छायाचित्रे काढण्याची कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू झाली. मंत्रीही त्यात आनंदाच्या भरात दंग झालेले. पण कुण्यातरी एका चाणाक्ष कार्यकर्त्याच्या लक्षात आले की , अरे आपले मंत्री भाजपचे अन् त्यांच्या मागे भिंतीवर सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या तसबिरी..! त्याने हीच गोष्ट मंत्री व इतरांच्या निदर्शनास आणून दिली आणि सगळेच चकित झाले. नंतर मंत्रिमहोदयानीही लगेच आपली जागा बदलली आणि पुन्हा फोटोसेशन सुरू झाले.
Satara: साताऱ्यात जादूटोणा करत तरुणीवर बलात्कार , आरोपीला अटक
स्वत: मंत्री महोदय विधानभवनात हा किस्सा सांगत असताना म्हणाले की “त्या कार्यकर्त्याच्या हे लक्षात आले नसते तर आमची पंचाईत झाली असती…!” मंत्री हा किस्सा ऐकवत असताना , त्यावेळी त्या दालनात कुणा अन्य पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे तर नाहीत ना, असे उपस्थित सगळेच डोळे फिरवून, माना वर करून बघू लागले तेंव्हा विधान भवनात सगळीकडे हास्यकल्लोळ झाला.