
भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता त्याच्यावर उपचार झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे. ऋषभच्या अपघातांनंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संजय राऊत यांचे मोठे भाकीत; नवीन वर्षात सरकार घरी बसणार?
दरम्यान देहरादूनच्या मॅक्स रुग्णालयामध्ये जाऊन अनिल कपूर व अनुपम खेर यांनी ऋषभची भेट घेतली आहे. यावेळी अनुपम खेर यांनी सर्वाना एका सल्ला दिलाय. ते म्हणले, “ गाडी सावकाश चालवा. कारण देहरादून भागामध्ये रात्री धुकं अधिक असतं. त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवा.” असा त्यांनी सर्वाना सल्ला दिला आहे.
‘वेड’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
दरम्यान ऋषभ पंतला भेटण्यासाठी क्रिकेट असोसिएशन डीडीसीए टीम रुग्णालयामध्ये पोहोचली आहे. यावेळी डीडीसीएचे संचालक शायम शर्मा यांच्याशी बोलत असताना पंतने अपघाताबाबत एक खुलासा केला आहे. यावेळी ऋषभ पंत म्हणाला, “गाडी चालवत असताना मला झोप लागली नव्हती तर समोर एक खड्डा आला. आणि तो खड्डा वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला.”
बोगस रेशनकार्ड बनवणे पडले महागात; पोलिसांत गुन्हा दाखल…
माहितीनुसार, या अपघातामध्ये ऋषभच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी देखील केली जाणार आहे.