सध्या कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. कांद्याला भाव नसल्यानें कांदा विकून उत्पादन खर्च देखील निघत नाही. आता कांद्यापाठोपाठ कलिंगड उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे. करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथील शेतकरी रामभाऊ रोडगे यांना तीन क्विंटल कलिंगड विकून फक्त 3 हजार 400 रुपये मिळाले आहेत.
रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेडचा दुष्काळ हटणार!
त्यामुळे शेतकऱ्याला पैसे तर मिळत नाहित उलट खर्च देखील निघत नसल्याचे आपल्याला दिसतं आहे. कलींगड उत्पादक शेतकरी रामभाऊ रोडगे यांनी तीन टन कलिंगड विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणले होते. यावेळी हे तीन टन कलिंगड काढण्यासाठी मजुरी अडीच हजार रुपये, गाडी भाडे 4 हजार रूपये, हमाली 960 रुपये, असा त्यांना सर्व खर्च 7 हजार 960 रुपये झाला आणि कलिंगडाचे फक्तं 3 हजार 400 रुपये मिळाले यामुळें कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसमोर देखील मोठं संकट उभा राहील आहे.
साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर बाबांनी मागितली माफी; म्हणाले…
दरम्यान, उन्हाळ्यात एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांची मागणी अधिक असते, परंतू सध्या तसे चित्र काही दिसून येत नाही. उलट कलिंगडचे दर प्रचंड (Watermelon Price) घसरले आहेत.