Prithvi shaw ने हाफ सेंच्युरी ठोकल्यावर नाशिकच्या मुलीने केले गजब सेलिब्रेशन, तिने पृथ्वीसाठी खास….

After Prithvi shaw's half-century, the girl from Nashik had an amazing celebration, she made a special for Prithvi….

IPL २०२३ : भारतीय संघाचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi capitals) बॅट्समन पृथ्वी शॉ याची लोकांनी मानलेली प्रियसी नाशिकची आहे. पृथ्वीच्या सपोर्टसाठी ती नेहमी मैदानात असते. पृथ्वीने पंजाबला कालच्या मॅच मध्ये हाफ सेंच्युरीसह धूळ चटकवली आहे . IPL २०२3 च्या सीजनची सुरुवात पृथ्वी साठी चांगली झालेली नव्हती. टीम इंडियाच नेतृत्व करणारा पृथ्वी सीजनच्या सुरुवातीलाच फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्याला playing 11 मधून काढण्यात आलं. दिल्ली कॅपिटल्स ने पृथ्वीला पुन्हा एकदा पंजाब विरुद्धच्या मॅच मध्ये ओपनिंगची संधी दिली. यावेळेस मात्र पृथ्वीने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा केला.

Lumpy । शेतकऱ्यांनो सावधान! आटोक्यात आलेला लंम्पी पुन्हा वाढतोय

शॉ ने पंजाब विरुद्ध अटॅकिंग बॅटिंग करत हाफ सेंचुरी मारली. पुन्हा एकदा पृथ्वीने दाखवून दिलं की तो किती क्लास प्लेयर आहे. पृथ्वी ने किंग्स विरुद्ध च्या मॅच मध्ये ३८ बॉल मध्ये १४२.११ च्या स्ट्राइक रेटने ५४ रन्स काढल्या. प्रेक्षक स्टॅन्ड मधून खास पृथ्वीसाठी चीअर करत होते. पृथ्वीच्या या आक्रमक खेळीत त्याने ७ फोर आणि १ सिक्स मारला. दिल्लीला त्याने एक चांगली ओपनिंग दिली. पृथ्वीला या मॅचमध्ये प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. पृथ्वीला सपोर्ट करता स्टेडियम मध्ये निधी तापडिया (Nidhi Tapdiya) देखील उपस्थित होती.

छोट्या कलाकारांचा मोठा धमाका, ‘द केरळ स्टोरी’ ने १३व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी; वाचून डोळे पांढरे होतील

निधीचं नाव पृथ्वीच्या बरं जोडलं जातं. पृथ्वीची कालची धडाकेबाज बॅटिंग पाहून तिने इंस्टाग्राम वर स्टोरी शेअर केली होती. पृथ्वीने देखील तिला मेन्शन बॅक केलं. निधी पेशाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर १०७K पेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत. निधी कॉमर्स साईडने शिकली आहे. निधीने प्रसिद्ध क्राईम शो CID मध्ये देखील काम केले आहे.

Prithvi shaw ने हाफ सेंच्युरी ठोकल्यावर नाशिकच्या मुलीने केले गजब सेलिब्रेशन, तिने पृथ्वीसाठी खास….

निधी आणि पृथ्वी यांनी एकमेकांचे बरेच फोटो पोस्ट केलेले आहेत. त्या दोघांनी आपल्या नात्याबद्दल अजून जाहीरपणे काहीही सांगितलेले नाही. पृथ्वीने फोटो शेअर केला आणि लगेच डिलीटही करून टाकला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मुंबईमधील एका हॉटेलच्या बाहेर पृथ्वी शॉ भांडण करत होता त्याच्यामुळे तो बराच चर्चेत आला होता. सपना गिल आणि तिच्या मित्रासोबत पृथ्वीचे भांडण झाले होते. त्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड वायरल झाले होते. पोलीस स्टेशनला दोघांनी देखील परस्पर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या बॅटिंग वर एकंदरीत परिणाम झाला आहे असं म्हटलं जातं.

Co-operative Banks | राज्यातील २० टक्के सहकारी बँकांचे घोटाळे चव्हाट्यावर; दंडात्मक कारवाईमध्ये महाराष्ट्र टॉपला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *