अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. राखी ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर राखी सावंत लोकांचे मनोरंजन करण्यात आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात नेहमीच अग्रेसर असते. दरम्यान, राखी सावंतला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
बऱ्याच दिवसांपूर्वी राखी सावंत हिच्यावर शर्लिन चोप्राने आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. आता याप्रकरणी राखी सावंतला अटक करण्यात आली आहे. शर्लिन चोप्राने राखीला सावंतला अटक केल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली आहे. आणि आता शर्लिनने राखीचा नवरा अदिलबाबत भाष्य देखील केलं आहे.
नरेंद्र मोदी पुण्यात आले अन् ठाकरे सरकार कोसळलं; आजच्या दौऱ्यानंतर कोणता राजकीय भूकंप होणार?
शर्लिन म्हणाली, “मागच्या काही दिवसांपूर्वी राखी चा नवरा आदिल माझ्याकडे आला आणि म्हणाला, राखीला माफ कर त्यावर मी त्याला म्हंटले, तुझ्या पत्नीने माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले, तुला माझ्याबद्दल थोडीपण सहानभूती नाही? तुला फक्त तुझ्या राखीबद्दल सहानभूती आहे माझ्याबद्दल नाही? असं का? मी सामान्य आहे म्हणून का? या शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळणार ‘धनुष्यबाण’? राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण