Ratan Tata । मागील काही दिवसांपासून डीपफेक व्हिडीओ (Deepfake Video) व्हायरल होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर (Social media) अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ करून पोस्ट केले आहेत. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि बॉलिवूड अभिनेत्री कटरिना कैफ यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. (Latest Marathi News)
अशातच आता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा व्हिडिओ (Ratan Tata Deepfake Video) व्हायरल झाला आहे. या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये रतन टाटा ऑनलाइन सट्टेबाजी प्रशिक्षकाचे समर्थन करत आहेत. त्याशिवाय ते लोकांना आमिर खान नावाच्या व्यक्तीचे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यास सांगत आहेत. या व्हिडिओमुळे अनेकांना धक्का बसला आहे. ऑनलाइन बेटिंगबाबत संदिग्ध व्यक्तींना फसवण्यात येत आहे.
रतन टाटा काय बोलत आहेत?
रिपोर्टनुसार, या व्हिडिओमध्ये रतन टाटा असे म्हणत आहे की, ‘लोक मला नेहमी विचारतात की श्रीमंत कसे व्हायचे? तर मला तुम्हाला माझा मित्र आमिर खानबद्दल सांगायचे आहे. भारतातही अनेकांनी एव्हिएटर खेळून लाखो रुपयांची कमाई केली आहे. त्यांचे प्रोग्रामर, विश्लेषक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ChatGPT यांना धन्यवाद. यात जिंकण्याची शक्यता 90% पेक्षा अधिक आहे.