बारामती मधील कृषीक प्रदर्शन ( Krushik 2023) अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राज्यातील शेतकरी, व्यवसायिक व विद्यार्थी या प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत असतात. दरम्यान, आजपासून कृषी प्रदर्शनाला सुरवात झाले आहे. आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे कृषिप्रदर्शन पाहण्यासाठी हजेरी लावली. त्याचबरोबर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील या प्रदर्शनाला हजेरी लावली.
नरेंद्र मोदी पुण्यात आले अन् ठाकरे सरकार कोसळलं; आजच्या दौऱ्यानंतर कोणता राजकीय भूकंप होणार?
या ठिकाणी येऊन देखील शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी एक डायलॉग मारला आहे. त्यांनी राजेंद्र पवार यांचे कौतुक केले आहे. शहाजीबापू पाटील म्हणाले, “काय ते कृषी प्रदर्शन, काय ते सगळं नियोजन, काय ते राजेंद्रदादांच कृषी विषयाच ज्ञान, सगळं काही ओके मधे आहे” सध्या त्यांच्या या वक्तव्याचीच सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनी सर्व प्रदर्शनाची पाहणी करून आपण सांगोलात अशीच शेती करणार असल्याचे देखील सांगितले. यावेळी अनेक लोक तिथे उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळणार ‘धनुष्यबाण’? राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
दरम्यान, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनीही राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांचे कौतुक केले आहे. सत्तार म्हणाले, बारामतीतील कृषी प्रदर्शन पाहून मी भारावून गेलो. बारामतीमधील कृषी प्रदर्शन फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील शेतकऱ्यांनी पाहायला हवं, राजेंद्र पवार यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे असं ते म्हणाले.