लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar) निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निवृत्त होऊ नये यासाठी भावनिक आवाहन केले आहे. याच सर्व गोष्टीचा विचार करून शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला मागे
नेमकं काय म्हंटल आहे ट्विटमध्ये?
राज्यातील,देशातील सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा,महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे. साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावं या आग्रहास्तव अध्यक्ष निवड समितीनं त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला.तेच अध्यक्षपदी कायम राहतील,हा निर्णय एकमतानं झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात,देशात उज्ज्वल यश संपादन करेल.
पुणे लोकसभा पोटनिवडणूक अलर्ट, गिरीश बापट यांच्या जागी कोण? राजकीय पक्षांची धांदल सुरू होणार
आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी. एकजुटीनं आणि अधिक जोमानं काम करावं, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असं आवाहन करतो. साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमानं पक्षाच्या कामाला लागलो आहोत. असं ट्विट त्यांनी केलं आहे सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.
मोठी बातमी! यूट्यूबला कंटेंट व्हिडीओ बनवण्याच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू