अपघातानंतर बच्चू कडू यांनी स्वतःच दिली तब्येतीबाबत माहिती; म्हणाले, “माझी प्रकृती ठीक असुन…”

After the accident, Bachu Kadu himself gave information about his health; Said, "I am fine..."

रास्ता ओलांडताना आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा अपघात झाला होता. हा अपघात अमरावतीमध्ये झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आता त्यांच्या तब्येतीबाबत स्वतः बच्चू कडू यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

ब्रेकिंग! राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड

बच्चू कडू यांनी ट्विट करत लिहिले की, “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये”.

मोठी बातमी! आमदार बच्चू कडू यांचा अपघात

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला इजा झाली आहे.

दिल्लीमधील महिलेवर पुण्यात बलात्कार; उपचार करण्यासाठी आली होती परंतु…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *