राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिली आहे. अज्ञात व्यक्तीने शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवास्थानी फोन करून ‘देशी कट्ट्याने ठार मारू’, अशी धमकी दिली आहे. आता यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटलांवर शाईफेकणाऱ्याची हत्तीवरुन मिरवणूक निघणार
अजित पवार म्हणाले, “शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती बाहेरच्या राज्यातील ती सापडलेली आहे. मात्र, त्यांचे ज्यावेळी फोन येते होते, त्यावेळी ती व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. अतिशय खराब शब्द वापरत होती”.
“छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते”; नाना पटोलेंच विधान चर्चेत
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वी देखील याच व्यक्तीने एकदा शरद पवार यांना धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलं होतं.
गुणरत्न सदावर्ते यांची मागणी, छत्रपती उदयनराजे महाराज यांना अटक करा