भाजपचा बालेकिल्ला म्हणून कसब्याला ओळखले जात होते. मात्र आता कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव करत कसब्यातून विजय मिळवला आहे. या निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते तर हेमंत रासने पिछाडीवर होते. धंगेकरांच्या विजयामुळे गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे. आता या पराभवांनंतर हेमंत रासने यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसब्यातून रवींद्र धंगेकरांचा विजय
हेमंत रासने म्हणाले, भाजपने मला उमेदवारी दिली आम्ही पूर्ण प्रयत्न देखील केले पण मतदारांनी मला स्वीकारले नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करेल. असं हेमंत रासने यावेळी म्हणाले आहेत.
भाजपच्या हातातून कसबा निसटणार? रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात कोण आघाडीवर? वाचा एका क्लीकवर
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. जे हक्काचे मतदान कमी झालं आणि विरोधी पक्षाचे जे प्रमाण वाढलं त्यामुळे माझा पराभव झाला असल्याचं यावेळी रासने म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.
सहाव्या फेरीत अभिजीत बिचुकलेंना मिळाली ‘इतकी’ मत; आकडा पाहून व्हाल थक्क