मागील काही दिवसांत पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. भाजप व महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. दोन्ही पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली होती. दरम्यान या निवडणुकीचा आज निकाल लागला असून चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या आहेत.
यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला आहे. मभाजपच्या अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ७० मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. यानंतर नाना यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! नागालँडमध्ये देखील राष्ट्रवादीचाच डंका
नाना काटे म्हणाले, राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आणि मोठ्या प्रमाणावर पैशांचं वाटप झालं यामुळं आमचा पराभव झाला असल्याचं यावेळी नाना काटे म्हणाले आहेत.