
Dasun Shanaka । भारतीय संघाने (Indian teams) गतविजेत्या श्रीलंकेवर (Sri Lanka) दणदणीत विजय मिळवत आठव्यांदा विजेतेपद जिंकले आहे. भारतीय संघाने सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत थेट फायनलमध्ये (Asia Cup Final) प्रवेश केला होता. या कामगिरीसह फायनलचे तिकिट मिळवणारा भारत हा पहिला संघ ठरला होता. भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून दारुण पराभव केला असून अंतिम सामन्यात विजयासाठी भारतीय संघासमोर फक्त 51 धावांचे लक्ष्य होते. (Sport News)
Bacchu Kadu । आधी वादग्रस्त वक्तव्य आणि नंतर बच्चू कडूंचा माफीनामा, म्हणाले; “माझा शब्द..”
लाजिरवाण्या पराभवानंतर श्रीलंकेच्या संघाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तो बोलताना म्हणाला की, ” हा आमच्यासाठी खूप अवघड दिवस होता. फलंदाजीसाठी हे पीच उत्तम असेल असे आम्हाला वाटले होते. मात्र त्याउलट झाले. पराभवानंतर आम्हाला काही गोष्टी समजल्या,” असे दसुन शनाका म्हणाला.
“आमच्या संघातील सदिरा, कुसल आणि असलंका यांनी चांगली फलंदाजी केली. सर्वोत्तम टीम्सना आम्ही पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. मी आलेल्या सर्व चाहत्यांचे आभार मानतो आणि त्यांची निराशा केल्याबद्दलही माफी मागतो. टीम इंडियाचं अभिनंदन,” अशी प्रतिक्रिया दसुन शनाका याने पराभवानंतर दिली आहे.
Mohan Bhagwat । मोहन भागवतांची डाव्यांवर सडकून टीका, म्हणाले; “मुलांच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबत..”